दिवस २९ – (८ जानेवारी २०१२)

by Ideafest

१) मागचा आठवडा ४ दिवसांचाच होता, तसे पाहायला गेलो तर मागचे ४ आठवडे हे ४ दिवसांचे होते. डिसेंबर महिना खरोखर निवांत होता. पण आता हळु हळु काम पुन्हा वाढु लागले आहे. शिवाय हा जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे तरी हिमवर्षाव अजुनही झाला नाही. काही कळत नाही. मागच्या वर्षी डिसेंबर मधे तर बर्फ पडुन पडुन डोक्याला ताप आणला होता. त्यावेळचे फोटो फार भन्नाट आहेत. जर तुम्हाला पहायचे असतील तर टाकतो.


२) सध्या आम्ही इथे माफिया नावाचा एक खेळ खेळतो आहे. आपल्याकडे राजा, राणी, चोर, शिपाई कसा खेळतो, अगदी तसाच. याविषयी सविस्तर लिहिन कधीतरी.


३) “In Time” नावाचा एक चित्रपट पाहिला, चित्रपट एवढा आवडला नाही, पण विषय फार ओळखीचा तरीही अनवट होता. हि कथा त्या कथाकाराला कशी सुचली असेल त्यालाच माहीत पण मला विषय फार आवडला. टाईमपास म्हणुन एकदा fast forward मधे पाहु शकता.


४) शनिवारी रात्री मित्राच्या बायकोचा वाढदिवस असल्यामुळे जेवणावळ झडली, आणि झोपायला रात्रीचे ३ वाजले. मग दुसरा दिवस असाच गेला. दुपारी मॉलमधे गेलो होतो, कधीनाही ते मला कपडे आवडले आणि शॉपिंग झाली. माझ्या एका मित्राला कॅलिग्राफि आवडते, त्याच्यासाठी एक पेनचा सेट घेणार होतो पण बायको म्हणाली यापेक्षा चांगले मिळतील नेटवर, मग काय, शिस्तीत पेन सेट पुन्हा रॅकवर ठेवला.


५) मला इथे सुवासिक मेणबत्त्या मिळतात त्याचे फार आकर्षण आहे. थंडी मधे आगिच्या दर्शनानेही थोडा उबदारपणा येतो.


६) मला एक फाउंटन पेन ही घ्यायचे आहे, कधी घेणार ते माहित नाही.


७) जगजितसिंग आता आपल्यात नाहित, यावर अजुनही विश्वास बसत नाही. 😦


६) मला कोणी खालिल संस्कृत वाक्याचा अर्थ सांगेल का?

“विरहोपि संगम: खलु परस्परसंगतं मनो येषाम्।”– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी