दिवस २६ – (५ जानेवारी २०१२)

by Ideafest

आज एक मस्त कविता सुचली. पण ब्लॉगवर टाकली नाही. मला माझे एक पुस्तक छापायचे आहे. पण माहित नाही कधी.


नीरजाच्या ब्लॉग चाळताना एक भन्नाट वाक्य सापडलं

“Lavish is vulgar, nudity isn’t.”

जबरदस्त!!! मला पटलं. कधी कधी एखाद्या टिपीकल लग्नात नखशिखान्त दागदागिने घालुन सजलेली बाई किती हिडिस दिसते, अन कधी साध चाफ्याचं फुल केसात माळलेली साधी मुलगी पुन्हा मागं पहायला उद्युक्त करते.
सध्या इथे थंडी प्रचंड वाढली आहे. -१३ काल रात्रीचे तापमान. वाट.


आज सकाळी ६ वाजताच जाग आली. नंतर रात्री पडलेलं स्वप्न आठवलं. मला नाहीतर रात्री पडलेली स्वप्न आठवत नाहीत. पण आज आठवलं ते असं, “रात्रीची वेळ, मी गच्चीत उभा होत्तो आणि अचानक आकाशातुन विमानाचा आवाज, ते विमान डकटेल्स मधल्या बल्लु च्या विमानासारखे होते. आणि पाहता पाहता त्या विमानाने दिशा बदलली आणि ते वेगाने जमिनीकडे येऊ लागले. आणि थोड्याच वेळात ते एका देवळावर पडले.” याचा अर्थ काय मला माहित नाही आणि जाणुन घ्यायची इच्छा नाही. मी मानत नाही.


काल बायकोने माझ्या कविता तिच्या मैत्रिणीला वाचुन दाखवल्या, त्यावर तिची मैत्रीण म्हणाली, “आपण आयुष्य खेचत राहतो, हि लोक आयुष्य खर्‍या अर्थाने जगतात.” मला अजुनही ती असे का म्हणाली ते झेपले नाही. असो. आणि गम्मत म्हणजे बायकोलाही स्वप्न पडले त्यात मी हरवलो असे तीने पाहिले. जाम टेंशन मधे होती सकाळी 🙂


सध्या शॉर्टफिल्मच्या स्टोरीबॉर्डमधे व्यस्त आहे. मजा येते आहे. पण बराच वेळ खाणारे काम आहे. एकदा स्टोरीबोर्डींग संपले कि मग पाहु पुढे कसे काय करायचे. अजुनतर हे पण ठरले नाही कि हि शॉर्टफिल्म हिंदी, मराठी का इंग्रजी मधे करायची. कलाकार पण शोधायचे आहे. बरेच काम आहे. कधी करणार ते माहित नाही. शेखर कपुर ने म्हटले आहे त्याच्या ट्विटर वर कि क्रियेटिवीटीमधे सगळ्या महत्वाचे तिन शब्द म्हणजे I dont know. किती खर आहे. सध्या डोळ्यासमोर फक्त हातात घेतलेले काम पुर्ण करण एवढंच मनात आहे. पाहुयात. पण मनात कुठेतरी वाटतय कि फिल्म मेकिंग जमेल आपल्याला म्हणुन. आणि हि शॉर्टफिल्म बनवणे हा माझा माझ्यावर केलेला विजय असेल. ईन्शा-अल्ला!!!


– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी