दिवस २३ – नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा (२ जानेवारी २०१२)

by Ideafest

सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नविन वर्ष आपल्याला आणि आपल्या आप्तस्वकियांना आनंदाचे आणि भरभराटीचे जावो.
बरेच दिवस इथे लिहिले नाही. मला दर दिवशी काही तरी इथे लिहायचे होते. पण काम वाढले, पाहुणे आले, वेळच नव्हता अशी तद्दन फालतु कारणे मला द्यायची नाहित, ज्याला लिहायचे असते तो कसाही लिहितो. खरतर मला काय लिहायचे हेच सुचत नव्हते. तश्या बर्‍याच गोष्टी केल्या मागच्या काही दिवसात…
मी शॉर्टफिल्म ची स्क्रीप्ट लिहिली, डोन २ पाहिला, ख्रिसमस साजरा केला, हॉवर्डमधे जाऊन आलो, वादळी पावसात उगाचच भटकलो, MI4 पाहिला.


१) मी माझ्या एका (ऑफिसमधल्या) मित्राला जेंव्हा सांगितले कि मी ब्लॉग वैगेरे लिहितो तर त्याने मला विचारले कि तु नाटक का नाही लिहित. तो पर्यंत माझे लेखन ललिल प्रकारात मोडत होते. तसे पाहिले तर ९०% आंतरजालावरिल मराठी ब्लॉग हे एकतर कविता किंवा ललित लेख यातच मोडतात. तसे काही अपवाद आहेत. असो. पुन्हा मुळ विषयाकडे वळुया. तर त्या मित्राने विचारल्यानंतर मी जरा कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. तसा तो इयत्ता पहिलीच्या लायकिचा होता असे माझे प्रांजळ मत अजुनही आहे. मला जी ए कुलकर्णींच्या out of the box उपमांचा दाखला देऊन लिहिलेल्या कथा आवडतात. त्या कथा प्रकाराला काही तरी शास्त्रिय नाव आहे. आता आठवत नाही. त्याचप्रमाणे अस्मादिकांचे शॉर्ट फिल्म बनवायचे स्वप्न फार पुर्वीचे आहे. मी एकदा तसा प्रयत्नही करुन पाहिला होता, शुटिंगही छान झाले होते, पण साऊंड एडिटींगमधे प्रॉब्लेम झाला आणि सगळेच गंडले. पडद्यावर नुसतीच खर खर आली. पण त्यावेळी बरेच काही शिकलो. त्या गोष्टीला आता तिन वर्षे झाली असतील. त्याचे फुटेजही हरवले आहे बहुतेक…:( वाईट वाटते. पण असो. मागच्या आठवड्यात एक झकास स्क्रिप्ट लिहिली आहे. त्याच्यावर काम सुरु केले आहे. लोकेशन झाली आहे. आता अ‍ॅक्टर्स शोधतो आहे. संपुर्ण स्क्रिप्ट लिहिण्याचे माझे एक स्वप्न तरी पुर्ण झाले आहे. आता एक चांगली (उत्तम निर्मिती मुल्ये) असलेली शॉर्टफिल्म बनवायची आहे. आता बायको म्हणते आहे कि चुकिच्या प्रोफेशन मधे आला आहेस.


२) डॉन ३ पाहिला. तसा पाहिला तर चित्रपटात हिट होण्यासाठी लागणारा सर्व मसाला आहे. उत्तम निर्मिती मुल्ये आहेत, चांगले अभिनेते व अभिनेत्री आहेत. परदेशी चित्रीकरण आहे. पण तरिही मला हा चित्रपट नाही आवडला. चित्रपट पहिल्या फ्रेमपासुनच दर्शकांच्या मनाची तयारी करुन घेतो कि हा चित्रपट हॉलिवुडच्या दर्जाचा आहे आणि बॉलिवुडसारखा फारतु रडगाणे वैगेरे यात नसणार आहे. आणि पहिला एक तास दर्शकालाही हे पटते आणि त्याच्या अपेक्षा वाढतात. पण नंतर हा चित्रपट इतर हिंदी चित्रपटांच्या मार्गाने जातो. तसेच मला त्याच्या कथेमधेही दोष आढळले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठल्या बहिणीच्या मनात आपल्या भावाच्या खुन्याबद्द्ल मनात प्रेम उत्पन्न होईल? मला या चित्रपटात सगळ्यात जास्त आवडलेला भाग म्हणजे ह्र्-तिक आणि प्रियांका चा बॅले. जबरदस्त सिन आहे तो. मास्टरपिस.


३) मागच्या आठवड्यात हॉवर्ड युनिव्हर्सिटीमधे जाऊन आलो. मस्त वाटले. कॉलेजमधे असताना कधी वाटलेही नव्हते कि मी एक दिवस इथे येईल. इथे प्रवेश नाही मिळाला पण पाहिला तर मिळाले. कदाचित भविष्यात प्रवेशही मिळेलही. पाहुया.


४) काल फेसबुक वर जगजीतचे चिठ्ठी ना कोई संदेश हे गाणे त्याच्याच काही फोटोंचा व्हिडियो बनवुन टाकले होते. काळजात काहीतरी दुखले.


– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी