दिवस ९ – तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा||

१) कालची पोस्ट अजुनही प्रकाशित केली नाही. कंटाळा केला. आज MI4 पाहायचा होता पण बहुतेक आज शक्य नाही होणार. उद्या पाहुया.

२) आज शनिवार, काल उगीचच जागत (पहाटे ३ वाजेपर्यंत) बसल्यामुळे आज उशिरा उठलो. पण बर्‍याच वेळा असे ही होते कि रोज ऑफिस ला जायला कंटाळा करतो पण शनिवार आणि रविवार मात्र पटकन उठुन बसतो. पण फक्त उठुन बसतो. तयार व्हायला, आंघोळ करायला उगीचच कंटाळा करतो.

३) मला केस कापायचे होते, माझ्या जुन्या प्रोजेक्टच्या मॅनेजरलाही कापायचे होते आणि मग काय दोन्ही फॅमिली निघाल्या मॉल मधे. तिथुन निघायलाच ४ वाजले. घरी पोचेपर्यंत ५ वाजले. मी एक हॅन्डमेड पेपर ची डायरी\वही घेतली आहे. आणि घरी आल्या आल्या त्यात लिखाण ही सुरु केले आहे. हॅन्डमेड पेपर वर अक्षर अजुन छान वाटतात. लिखाणाला एक Aunthenticity येते. (निदान मला तरी असे वाटते.)

४) जिम ला जाऊन आलो. आणि एक मित्र जो सारखा जिम ला बुट्टी मारत असतो त्याच्या घरी जाऊन आलो तर पाहतो तर काय त्याच्या रुम पार्टनर ने २ लिटर चा Jack Daniel ची बाटली आणली होती. आणि हा रुम पार्ट्नर दर शनिवारी उपवास करतो आणि रात्री दारु पितो. आवरा. मी ही कॉलेज मधे असाच weird होतो म्हणा. मी सिगरेट आणि लस्सी एकत्र प्यायचो 🙂 (आवरा)

४) त्या माझ्याबरोबर मॉल मधे आलेल्या मित्राला एक मुलगी आहे. इतकी गोंडस आहे ती कि काय सांगु. आणि तिला माझे सात मजली हसु फार आवडते. त्यामुळे मी तसे हसावे म्हणुन ती मला ना ना प्रकारे हसवण्याचा प्रयत्न करत असते.

५) संध्याकाळी आमच्या बंगाली मित्राकडे त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त बिर्याणी आणि मटन चा बेत होता. काय मटन झाले होते. अहाहा!!! अजुनही चव जिभेवर रेंगाळत आहे. आणि त्यानंतर अजुन एका मित्राकडे गेलो. पण तिथेही जेवण उत्तम होते असे इतर जेवणार्‍यांकडुन कळाते पण आमचे उदर आधिच भरले असल्यामुळॅ त्याचा आस्वाद घेता नाही आला.

६) आजही झोपायला रात्रीचे (पहाटेचे) २:३० झाले.

– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी