दिवस ६

by Ideafest

१) काल बेड ऐवजी कारपेटवर झोपलो तरी मान दुखायची थांबली नाही.२) मला नेहमी वाटायचे कि बस ड्रायव्हर जर मी एकटाच बस स्टोपवर असेल तर न थांबताच निघुन जातो. पण आज मी हात केल्यावर बस स्टॉप नसताना देखील थांबला. बरे वाटले. शेवटी माणुस म्हणजे माणुस असतो. हाडामांसाचा, आणि भावभावनांचा.३) घरात एक गिटार, कि-बोर्ड आणि अ‍ॅकोर्डिअन धुळ खात पडुन आहे. वाट बघत असतील कदाचित मी कधी हात लावेन त्यांना. किंवा खुश असतिल माझ्या सारखे (?)(इथे तुम्हाला पाहिजे तो अर्थ घ्या, I dont care) त्यांना हात लावत नाही म्हणुन.४) काल एकाचा ब्लोग वाचला, तो बंधु दारुच्या व्यसनाशी लढत होता. २१ वर्षे त्याने दारु पिली. नोकरी वैगेरे सर्व गमावुन बसला. पण ब्लॉग छान लिहितो. पण त्याने त्याचे लिहिलेले अनुभव वाचुन शहारे आले. 😦 त्याला मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते.

“जिंदगीभर गालिब यही गलती करता रहा,
धुल चेहरेपर थी और आईना साफ करता रहा,”५) अरे हो, मागच्या महिन्यात विहिर हा चित्रपट पाहिला. आवडला का नाही हे मला समजल नाही. (बहुतेक चित्रपटाचे काही भाग कळले नाहीत). पुन्हा पाहणार आहे. त्यानंतरच खरा review देईन.६) आज आय्-पोड वर “Rockstar” डे आहे. सकाळ पासुन त्यातली शेहनाई, कुन-फय-कुन, कतिया करु आणि माझे सगळ्यात आवडते जो भी मै भरपुर वेळा ऐकुन झाले. मस्त वाटते आहे. (मानेचे दुखणे विसरलो आहे.) कोणीतरी म्हणले आहे ना

“Happiness chooses its own time.”७) आज बाबांचा सकाळी सकाळी ६:३० वाजता फोन आला. बंगल्याच्या पार्किंग मधे वारली पेंटिंग काढले आणि छान दिसते आहे. आमचे बाबा म्हणजे फार मनस्वी आहे. मनात आले कि करुन टाकतात. काही विचारु नका. त्यांच्याबद्दल पुन्हा केंव्हा तरी. पण मनस्वीतेवरुन संदिप खरे च्या कवितेच्या काही ओळी आठवल्या.

“मी मनस्वीतेला शाप मानले नाही अन उपभोगाला पाप मानले नाही,
ढग काळा ज्यातुन एकही गेला नाही, नभ ऐसे मी अद्याप पाहिले नाही”८) संदिप खरे आणि सलिल कुलकर्णी यांचे आमच्या पिढीवरील उपकार आहेत, त्यांनी आमच्या पिढिला मराठी पुन्हा शिकवली. खुप खुप आभार, संदिप आणि सलिल!!!९) रघु दिक्षीत चा एक नवीत अल्बम आला आहे. मस्ती कि बस्ती. तोही भारीच असणार. 🙂 तुम्ही म्हणणार च्यायला त्या रघु पेक्षा तुला त्याच्यावर जास्त विश्वास आहे. अहो दादा, असे कधी तुमच्या बरोबरपण झाले असणार. आपल्यापेक्षा आपल्यावर दुसर्‍यांचाच जास्त विश्वास असतो.१०) खुप खुप वर्षांपुर्वी म्हणजे शाळेमधे असताना माझ्याकडे एक फिश पाँड होता. ब्लॅक मोली, किसिंग गोरामी, गप्पी, शार्क, इल, गोल्ड फिश, खाण्यासाठी किडे, ऑक्सिजन मशिन सगळ होतो पण त्याच वर्षी उन्हाळ्यात तापमान खुप वाढले आणि अ‍ॅरलडाईट वापरुन बनवलेल्या त्या फिश पाँड च्या कांचांचे जोड निघाले आणि लिक होऊ लागले. घरचे वैतागले आणि सगळे मासे एका ओळखीच्यांना देऊन टाकले. 😦 आता पुन्हा कधी घेणार फिश पाँड काय ठाऊक.(आणि हि पोस्ट संपवताना मी जगजित ची तेरा चेहरा कितना सुहाना लगता है ऐकतो आहे.)– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी