दिवस ५

by Ideafest

१) जिम चालु करुन १ महिना झाला आज. बरे वाटते आहे. काही तरी जिवाला चांगले करतो आहे. माझे आजोबा पैलवान होते. त्यांच्यासाठी आमच्या कडे गाय पाळली होती. “कल्याणी” नाव तिचे. रोज एक चरवी दुध प्यायचे आजोबा. आमचे बाबा हि काही कमी नाही एका बुक्की नारळ फोडला होता माझ्या देखत. आणि बाबांनी व्यायाम सोडुन ३५ ते ४० वर्षे झाली असतिल. त्यामुळे असा वारसा असेल तर मी तर कोल्हापुरात तालिमच लावली पाहिजे होती. Actually लावणार होतो पण अभ्यासामुळे जमले नाही. शाळेत जेंव्हा आम्ही वाचले कि टिळकांनी दोन वर्षे शाळा, कॉलेज सोडुन फक्त व्यायामासाठी दिली. आम्ही फार impress झालो होतो. पण आम्हाला जमले नाही.२) आज बाहेर -३ डिग्री तापमान होते. पण येताना त्रास होत नाही कारण गरम पाण्याने आंघोळ करुन गरम गरम चहा घेऊन निघतो, पण चालत जाताना मात्र त्रास होतो. कार घ्यायला पाहिजे आता. माझा आळस लायसन्स काढायचा. 😦३) सयाजी राव गायकवाडांनी म्हणे दिल्ली दरबारात इंग्लंडच्या राणीचा अपमान केला होता, BBC ने त्याची बातमी छापली होती. मराठी रक्तातील धुगधुगी अजुन गेली नव्हती हे जाणुन बरे वाटले. (http://www.bbc.co.uk/news/world-asia-16051168)४) आज आंतरजालावर चारुता सागर यांचे पुस्तक कुठे विकत मिळते आहे का पाहिले, पण सगळी कडे out of stock दाखवते आहे. मला वाचायचे आहे त्यांना. प्लिज प्लिज प्लिज जर तुम्हाला कुठे मिळाले तर मला कळवा.५) Euphoria चा Item अल्बम ऐकला, नेहमी प्रमाणेच हाही अल्बम छान आहे, पण काहीतरी कमी वाटली. त्याच्या आधीच्या Band मधील फक्त एकच जण आता त्याच्याबरोबर आहे. आणि या अल्बम मधे रॉक संगित जरा जास्तच वापरले आहे. असो. तरिही मी त्यांचा चाहता है. पलाश सेन, आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है.६) हल्ली मान सारखी दुखत असते. बहुतेक माझी झोपायची पद्धत चुकीची आहे.– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी