दिवस ४

by Ideafest

१) मी गेल्या १० महिन्यापासुन घसा फाडुन बोंबलुन आमच्या अमेरिकेतील Accounts ला सांगत होतो कि माझी काही बाकी असेल तर सांगा. पण ते म्हणले नाही सगळी Recovery झाली आहे. आणि आज भारतातील Accounts ची इमेल आली कि तुमची बाकी आहे. मग आताच मी अमेरिकेतील Accounts ला इमेल पाठवली आहे. फुल टु चिडचिड. सध्या अमेरिकेत डॉलरमधे पगार असुनही कडकी चालु आहे असे वाटते आहे.२) आज सोमवार, ८ वाजता ऑफिसमधे यायचे ठरवले होते, पण येता येता ८:४० झाले. उद्या ८ वाजता यायला हवे. हल्ली येते हिवाळ्यामुळे ४:३० लाच अंधार पडतो. आणि रात्री रस्त्यावर चालणे सुरक्षित नाही. त्यामुळे लवकर निघायचे बघतो.३) आज एका टॉरंट्च्या () साईटवर एकाच्या सिग्नेचर मधे हे वाक्य वाचले कि “Most good things in life are either illegal, immoral or fattening….. ” आणि च्यायला डोक्यात किडा गेला. खरचं असं असु शकते का? मी स्वतः पासुनच सुरुवात केली. कि माझ्याबद्द्ल हे वाक्य खरे आहे का? आईच्या हातचे जेवणं, आजीच्या कुशीत झोपणे, बाबांचे विनोद हे सारे illegal, immoral or fattening आहे का? हे वाक्य म्हणजे बोलबच्चनगिरी आहे. सरळ रस्ता सोडुन उकिरड्यात घुसायचे आणि समाजाला सांगत फिरायचे कि मी किती out of the box विचार करतो. USELESS !!!४) बर्‍याच वेळा परदेशात भारतीयांना काही मुर्ख लोकांकडुन हिन दर्जाचे टोमणे रस्त्यावर चालताना किंवा बस मधे ऐकु येतात त्यांना प्रत्युतर देण्यासाठी एक भारी वाक्य मिळाल आहे. “I belong to land of kaamsutra, I can fuck you in more ways than you count.” जबरीच. हे वाक्य लिहिणारा पुणेकरच असेल, कमीत कमी शब्दात जास्तित जास्त अपमान (-पु.ल्.देशपांडे)५) Euphoria चा नविन अल्बम आला आहे “Item”. काल डाऊनलोड केला, पण अजुन आयपॉडवर टाकला नाही. Euphoria माझा आवडता बँड आहे. पलाश सेन एक भारी माणुस आहे.६) सध्या फेसबुक बरेच लोक अभिमानाने सांगत फिरत आहेत कि पुणे राहण्यासाठी उत्तम असे दुसरे शहर आहे. अहमदाबाद पहिले आहे. पण खरच पुणे राहण्यासाठी उत्तम आहे का? ट्रॅफिक जाम, कोलमडलेली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था आणि म्हणे दुसरे उत्तम शहर!!! (मी पुणेकर आहे, पण फुकटचा अभिमान बाळगणे सोडुन दिले आहे.) इथे ग्रेस च्या काही ओळी आठवतात.

“डोंगरावरी आग, अलिकडे सर्व निवांत, निजतात कसे हे लोक, सरणाच्या खाली शांत”७) अजुन एक भारी विचार मला The Atom यांच्या या ब्लॉग (http:\\unstableweirdness.blogspot.com) वर मिळाला.

Bitterness is like pus.
You need to get it out, throw it up completely, till nothing remains inside.
Only then the wound can begin to heal.
If the bitterness is bottled up inside, all it will do is spread and eat you up from within.. Till you become and empty shell of bitterness..
If you want happiness to come, free up the space and let the bitterness out..
Let people know what you feel.
Pus is not a nice thing to cajole. Remove it by expressing and burn it by apologizing, understanding and forgiving.

:)भारीच!!!८) माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही आहे कि मी Big Boss 5 पाहतो आहे आणि follow करतो आहे. मी एवढा बदलेन असे मला वाटले नव्हते.– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी