दिवस ३

by Ideafest

१) आजचा दिवस हि असाच गेला, नाही म्हणायला जिम केली आणि सा प सा चा रियाज केला. मला आज माझ्या आवाजाला कुठला तानपुरा लागतो ते समजले.२) १० वीत असताना मी भजने फार सुंदर म्हणायचो, अर्थात असे माझे मित्र मला म्हणायचे. तेंव्हा मी संगिताला seriously घ्यायला पाहिजे होते. मग शिक्षणात अडकुन गेलो. आज करु उद्या करु असे करता करता बरेच पाणि पुलाखालुन वाहुन गेले. आता पुन्हा हिंदुस्तानी संगिताची आस धरली आहे. तानसेन नाही तरी एक जवाबदार कानसेन व्हायची इच्छा आहे.३) च्यायला, या वर्षीचे सवाई हुकले. सगळे मित्र फेसबुक वर अपडेट्स टाकत आहेत. हे फेसबुक पण आता डोक्यात जाते आहे. मला फेसबु़क आपली कशी वाट लावत आहे यावर एक लेख मिळाला आहे. इथे वाचा.४) जिम लावल्यापासुन पहिला मी मला पुन्हा मिळाला आहे असे वाटते आहे. आता काही झाले तरी जिमला दुर करायचे नाही. Health is wealth.५) जर तुम्हाला तानपुर्‍याचा आवाज आवडत असेल किंवा रियाज करायचा असेल तर इथे या संकेतस्थळावर तानफुकट मिळतो. You can thank me later 🙂६) मी नियमितपणे शिरीष कणेकर यांचे लोकप्रभा मधील स्तंभ लेख वाचतो. बाप माणुस आहे!!! काय memory आहे. त्यांचे जुन्या मुंबईवरचे लेख भारिच असतात. या लोकप्रभाच्या अंकात देव आनंदवर त्यांनी एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी लेखाच्या शेवटी मला सुन्न करुन टाकले. तो उतारा जसा च्या तसा इथे डकवत आहे. शिरीषजी Hat’s Off to you.

‘माझी फिल्लमबाजी’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमात मी म्हणतो, – ‘‘.. मग माझ्या लक्षात आलं की देव आनंद काय, दिलीप कुमार काय, राज कपूर काय किंवा लता मंगेशकर काय, आमच्या पिढीची भावस्थाने आहेत. एक राज कपूर जातो तेव्हा एक नट, निर्माता, दिग्दर्शक, संकलक व स्टुडिओचा मालक गेला, एव्हढी छोटीशी भावना नाही आमची. आमच्या लेखी आमच्या भावजीवनाचा एक भाग संपला. शरीराच्या एका अवयवाला लकवा मारला. शरीराचा एक भाग निकामी झाला. मृत्यू समीप आला.’’
देव आनंदच्या जाण्याने आमचा मृत्यू आता आणखी समीप आला आहे. देव साब, कहा सुना माफ कर देना. वी लव यु. वी ऑलव्हेज वील..७) आज आंतरजालावर फिरता फिरता जी.ए.कुलकर्णी [`रमलखुणा’मधील `प्रवासी’] चे एक वाक्य मिळाले, ते मी लगेच (ऐटित) फेसबुक वर टाकले. माझ्या एका अमराठी मित्राने विचारले अरे भाषांतर करुन सांग ना म्हणजे आम्हाला पण कळेल. च्यायला त्याला काय सांगु जगातिल ज्या अशक्य गोष्टी आहेत, जी.ए. च्या साहित्याचे भाषांतर त्यातलीच एक अशक्यप्राय गोष्ट आहे. तरी मी तोडका मोडका प्रयत्न केला आहे. तुमच्या काही सुचना असतिल तर अवश्य कळवाव्या.

“समोर पश्चात्ताप दिसला की त्याच्यामागे कसल्यातरी सुखाचे प्रेत आहे, याची माणसाने खात्री बाळगावी!!

आणि हे माझे भाषांतर -Root of regret is always a death of desire.

च्यायला काहिच्या काही 🙂८) मारियो मिरांडा गेले. तुम्हाला मिले सुरे मेरा तुम्हारा मधे जेंव्हा गोव्याचे दृश्य येते तेंव्हा एक चित्रकार नारळाची झाडे अन काही नावांचे चित्र काढताना मी लहानपणापासुन पाहिले होते. तेच हे मारियो मिरांडा. 😦– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी