दिवस २

by Ideafest

१) आज आमची क्लायंट ची ख्रिसमस पार्टी आहे. आमच्या मॅनेजरने सांगितले आहे कि Try to socialize. मी मनातल्यामनात एवढे हसत होतो कारण आमचे क्लायंट आमच्या प्रोजेक्ट मधल्या आमच्या काही मित्रांबरोबर स्ट्रिप क्लब ला जाऊन आले आहेत, आता यापेक्षा काय सोशलाईज (socialize) होणार. पण मॅनेजरची पण बिचार्‍याची काय चुकी, तो त्याचे काम करत आहे. असो.२) टाइम या जगविख्यात मासिकाने अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा वर्षांतील १० महत्त्वाच्या जागतिक घडामोडींमध्ये समावेश केला. आजच लोकसत्ता मधे हि बातमी वाचली. मला अण्णा हजारे यांच्याबद्द्ल नितांत आदर आहे. पण कधी कधी ते असे काही वागतात बोलतात कि ते पासुन मनात प्रश्नचिन्ह उभे होते. पण मला माझे मन सांगत आहे कि ते एक निर्मळ मन असलेले मनुष्य आहेत आणि त्यांचे हेतु स्वच्छ आहेत.३) दरवेळेस परदेशी असताना भारतातील काय मिस केले याचा बर्‍याचदा आढावा घेतला जातो किंबहुना बहुतेक वेळा आपल्या नकळत तो लादला जातो. मित्रांच्या आणि ऑफिसातल्या गप्पांमधे भारतातले विषय निघतात आणि मग तोंडातुन नकळत उद्गार निघतात “च्यायला, आत्ता भारतात हवे होतो आपण.” पण दरवर्षी दिवाळीत, किंवा गणपतीत असे नेहमी होते. पण हे वर्ष दोन वेगळ्या घटना घेऊन आले ज्याने इतिहास लिहिला गेला. त्यातली पहिली होती भारताचा क्रिकेट वर्ल्ड कप विजय आणि अण्णा हजारे यांचे जनलोकपाल आंदोलन. मी भारतात नसल्यामुळे दोन्ही घटनांचा उन्माद मिस केला. तसे आम्ही इथे जनलोकपाल आंदोलने केली पण ती सर्व स्वतःच्या आत्मिक सुखाकरता.४) मला कोलावरी डि गाणे आवडले, का आवडले हे नाही सांगता येणार, मी हे गाणे पहिल्यांडा ऐकले तेंव्हा लागोपाठ ५ ते ६ वेळा ऐकुन पाहिले. यु टुयब मुळे मार्केटिंग करायला एक नवा फुकटचा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. ज्याला त्याचे काम जगाला दाखवायचे आहे, त्याने त्याचा व्हिडियो बनवावा आणि यु ट्यूबवर टाकावा. प्रत्येक व्हिडिओसाठी जगात कोणीतरी प्रेक्षकही असतो.५) फेसबुक बंद करायचे किती दिवसांपासुन विचार करतो आहे. पण करवत नाही. का? मित्र, शेअर केलेल्या पोस्ट्स का काय आहे तिथे ज्या मुळे फेसबुक बंद नाही करता येणार?६) गुगल बुक्स वर खुप पुस्तके जमा केली आहेत, ती ही वाचायची आहेत. राहुन राहुन चित्रा आणि जगजित ची गझल आठवते.
“ये करे वो करे, ऐसा करे वैसा करे, जिंदगी दो दिन कि है, दो दिन मै हम क्या क्या करे.”७) साहेब बिवी और गँगस्टर चित्रपट पाहिला. मला चित्रपट आवडला. माही गिलचा अनुभव मला मनापासुन आवडतो. तिचा मी गुलाल पाहिला आहे. बाकि बरेच चित्रपट आहेत तिचे, पण अजुन पाहायचे आहे. संवाद काय आहेत चित्रपटाचे. श्रेया घोषालचे गाणे “रात मुझे” हे गाणे हि आवडले.८) मी हा ब्लॉग नासा ने शोधलेल्या तार्‍याच्या केपलर च्या नावावरुन सुरु केला (keplerian.wordpress.com), पण केपलर हे नाव आधीच कोणीतरी घेतले होते म्हणुन मग केपलरवासी म्हणजेच केपलरिअन हे नाव ठेवले, पण आज गूगल सर्च मारला तर केपलर नावाचा एक थोर गणितज्ञ होऊन गेला आहे. कधी कधी अशी मोठी नावे ऐकुन वाटते कि अजुन आपण तर काहिच सॉलिड केले नाही आयुष्यात. कधी करणार? पण नंतर वाटते कि यासर्व थोर लोकांनी जे काही केले ते काही थोर करायचे असे ठरवुन केले का? का ते त्यांच्या आवडत्या गोष्टी करत गेले आणि त्यातुनच करता करता काहीतरी थोर घडुन गेले. माहित नाही.– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी