दिवस १

by Ideafest

१) – चरित्र म्हणजे स्वतःची न्युड फोटोग्राफी करुन प्रकाशित करणे, मग कोण त्या फोटोकडे कलात्मक दृष्टीने पाहिन, तर कोणी वासनेने पाहिन; तर कोणी चक्क ते फोटो पाहुन किळस आल्याचा सांगेन. पण त्यामुळे तुम्हाला काहि फरक पडला नाही पाहिजे. पण कर्म करुन स्वतःला एवढे अलिप्त करणे इतके सोपे आहे का? मला वाटते कि हि अलिप्तता आणि कर्म करण्याची कुशलता यात डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मी एखाद्या गोष्टीत अशक्य कुशल किंवा पारंगत असेन तर कदाचित मी ति मी मेहनतीने बनवलेली वस्तु पाण्यात सोडुन देईन. पण म्हणजे त्याच वस्तुची नवनिर्मिती करण्याचा आत्मविश्वास त्या वस्तुशी तुम्हाला अलिप्त करतो का?२) – या वाक्यापर्यंत मला वाटत होते कि बरेच विचार आहे जे मला इथे उतरावयाचे होते पण अचानक विज तळपुन जावी तसे विचार येतात आणि तसेच निमिषार्ध होतात. मला आठवते शाळेत वर्गावर शिक्षक नसताना अचानक ४ ते ५ सेकंडस वर्गात शांतता पसरायची आणि सर्वांना वाटायचे कि शिक्षकच आले आहेत, पण शिक्षक नसल्याचे कळताच दुसर्‍या क्षणाला गोगांट सुरु… तसेच काहिसे होते आहे हल्ली. बहुतेक एकाग्रता कमी होत आहे. कालच एक Quote वाचली. ‘Concentration only conquers, genious is intensity.” पण हे पडताळुन पहाण्यासाठी सुद्धा एकाग्रता लागेल ना. बर्‍याच दिवसांपासुन ठरवतो आहे कि ध्यान वैगेरे करुया, पण नाहिच होत. पण करायचे तर आहेच, आणि मी करणारच.– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी