केपलरवासी

मिट्टी का तन, मस्ती का मन, क्षणभर जीवन, मेरा परिचय – हरिवंशराय बच्चन

दिवस २९ – (८ जानेवारी २०१२)

१) मागचा आठवडा ४ दिवसांचाच होता, तसे पाहायला गेलो तर मागचे ४ आठवडे हे ४ दिवसांचे होते. डिसेंबर महिना खरोखर निवांत होता. पण आता हळु हळु काम पुन्हा वाढु लागले आहे. शिवाय हा जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे तरी हिमवर्षाव अजुनही झाला नाही. काही कळत नाही. मागच्या वर्षी डिसेंबर मधे तर बर्फ पडुन पडुन डोक्याला ताप आणला होता. त्यावेळचे फोटो फार भन्नाट आहेत. जर तुम्हाला पहायचे असतील तर टाकतो.


२) सध्या आम्ही इथे माफिया नावाचा एक खेळ खेळतो आहे. आपल्याकडे राजा, राणी, चोर, शिपाई कसा खेळतो, अगदी तसाच. याविषयी सविस्तर लिहिन कधीतरी.


३) “In Time” नावाचा एक चित्रपट पाहिला, चित्रपट एवढा आवडला नाही, पण विषय फार ओळखीचा तरीही अनवट होता. हि कथा त्या कथाकाराला कशी सुचली असेल त्यालाच माहीत पण मला विषय फार आवडला. टाईमपास म्हणुन एकदा fast forward मधे पाहु शकता.


४) शनिवारी रात्री मित्राच्या बायकोचा वाढदिवस असल्यामुळे जेवणावळ झडली, आणि झोपायला रात्रीचे ३ वाजले. मग दुसरा दिवस असाच गेला. दुपारी मॉलमधे गेलो होतो, कधीनाही ते मला कपडे आवडले आणि शॉपिंग झाली. माझ्या एका मित्राला कॅलिग्राफि आवडते, त्याच्यासाठी एक पेनचा सेट घेणार होतो पण बायको म्हणाली यापेक्षा चांगले मिळतील नेटवर, मग काय, शिस्तीत पेन सेट पुन्हा रॅकवर ठेवला.


५) मला इथे सुवासिक मेणबत्त्या मिळतात त्याचे फार आकर्षण आहे. थंडी मधे आगिच्या दर्शनानेही थोडा उबदारपणा येतो.


६) मला एक फाउंटन पेन ही घ्यायचे आहे, कधी घेणार ते माहित नाही.


७) जगजितसिंग आता आपल्यात नाहित, यावर अजुनही विश्वास बसत नाही. 😦


६) मला कोणी खालिल संस्कृत वाक्याचा अर्थ सांगेल का?

“विरहोपि संगम: खलु परस्परसंगतं मनो येषाम्।”– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी

दिवस २६ – (५ जानेवारी २०१२)

आज एक मस्त कविता सुचली. पण ब्लॉगवर टाकली नाही. मला माझे एक पुस्तक छापायचे आहे. पण माहित नाही कधी.


नीरजाच्या ब्लॉग चाळताना एक भन्नाट वाक्य सापडलं

“Lavish is vulgar, nudity isn’t.”

जबरदस्त!!! मला पटलं. कधी कधी एखाद्या टिपीकल लग्नात नखशिखान्त दागदागिने घालुन सजलेली बाई किती हिडिस दिसते, अन कधी साध चाफ्याचं फुल केसात माळलेली साधी मुलगी पुन्हा मागं पहायला उद्युक्त करते.
सध्या इथे थंडी प्रचंड वाढली आहे. -१३ काल रात्रीचे तापमान. वाट.


आज सकाळी ६ वाजताच जाग आली. नंतर रात्री पडलेलं स्वप्न आठवलं. मला नाहीतर रात्री पडलेली स्वप्न आठवत नाहीत. पण आज आठवलं ते असं, “रात्रीची वेळ, मी गच्चीत उभा होत्तो आणि अचानक आकाशातुन विमानाचा आवाज, ते विमान डकटेल्स मधल्या बल्लु च्या विमानासारखे होते. आणि पाहता पाहता त्या विमानाने दिशा बदलली आणि ते वेगाने जमिनीकडे येऊ लागले. आणि थोड्याच वेळात ते एका देवळावर पडले.” याचा अर्थ काय मला माहित नाही आणि जाणुन घ्यायची इच्छा नाही. मी मानत नाही.


काल बायकोने माझ्या कविता तिच्या मैत्रिणीला वाचुन दाखवल्या, त्यावर तिची मैत्रीण म्हणाली, “आपण आयुष्य खेचत राहतो, हि लोक आयुष्य खर्‍या अर्थाने जगतात.” मला अजुनही ती असे का म्हणाली ते झेपले नाही. असो. आणि गम्मत म्हणजे बायकोलाही स्वप्न पडले त्यात मी हरवलो असे तीने पाहिले. जाम टेंशन मधे होती सकाळी 🙂


सध्या शॉर्टफिल्मच्या स्टोरीबॉर्डमधे व्यस्त आहे. मजा येते आहे. पण बराच वेळ खाणारे काम आहे. एकदा स्टोरीबोर्डींग संपले कि मग पाहु पुढे कसे काय करायचे. अजुनतर हे पण ठरले नाही कि हि शॉर्टफिल्म हिंदी, मराठी का इंग्रजी मधे करायची. कलाकार पण शोधायचे आहे. बरेच काम आहे. कधी करणार ते माहित नाही. शेखर कपुर ने म्हटले आहे त्याच्या ट्विटर वर कि क्रियेटिवीटीमधे सगळ्या महत्वाचे तिन शब्द म्हणजे I dont know. किती खर आहे. सध्या डोळ्यासमोर फक्त हातात घेतलेले काम पुर्ण करण एवढंच मनात आहे. पाहुयात. पण मनात कुठेतरी वाटतय कि फिल्म मेकिंग जमेल आपल्याला म्हणुन. आणि हि शॉर्टफिल्म बनवणे हा माझा माझ्यावर केलेला विजय असेल. ईन्शा-अल्ला!!!


– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी

दिवस २३ – नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा (२ जानेवारी २०१२)

सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नविन वर्ष आपल्याला आणि आपल्या आप्तस्वकियांना आनंदाचे आणि भरभराटीचे जावो.
बरेच दिवस इथे लिहिले नाही. मला दर दिवशी काही तरी इथे लिहायचे होते. पण काम वाढले, पाहुणे आले, वेळच नव्हता अशी तद्दन फालतु कारणे मला द्यायची नाहित, ज्याला लिहायचे असते तो कसाही लिहितो. खरतर मला काय लिहायचे हेच सुचत नव्हते. तश्या बर्‍याच गोष्टी केल्या मागच्या काही दिवसात…
मी शॉर्टफिल्म ची स्क्रीप्ट लिहिली, डोन २ पाहिला, ख्रिसमस साजरा केला, हॉवर्डमधे जाऊन आलो, वादळी पावसात उगाचच भटकलो, MI4 पाहिला.


१) मी माझ्या एका (ऑफिसमधल्या) मित्राला जेंव्हा सांगितले कि मी ब्लॉग वैगेरे लिहितो तर त्याने मला विचारले कि तु नाटक का नाही लिहित. तो पर्यंत माझे लेखन ललिल प्रकारात मोडत होते. तसे पाहिले तर ९०% आंतरजालावरिल मराठी ब्लॉग हे एकतर कविता किंवा ललित लेख यातच मोडतात. तसे काही अपवाद आहेत. असो. पुन्हा मुळ विषयाकडे वळुया. तर त्या मित्राने विचारल्यानंतर मी जरा कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. तसा तो इयत्ता पहिलीच्या लायकिचा होता असे माझे प्रांजळ मत अजुनही आहे. मला जी ए कुलकर्णींच्या out of the box उपमांचा दाखला देऊन लिहिलेल्या कथा आवडतात. त्या कथा प्रकाराला काही तरी शास्त्रिय नाव आहे. आता आठवत नाही. त्याचप्रमाणे अस्मादिकांचे शॉर्ट फिल्म बनवायचे स्वप्न फार पुर्वीचे आहे. मी एकदा तसा प्रयत्नही करुन पाहिला होता, शुटिंगही छान झाले होते, पण साऊंड एडिटींगमधे प्रॉब्लेम झाला आणि सगळेच गंडले. पडद्यावर नुसतीच खर खर आली. पण त्यावेळी बरेच काही शिकलो. त्या गोष्टीला आता तिन वर्षे झाली असतील. त्याचे फुटेजही हरवले आहे बहुतेक…:( वाईट वाटते. पण असो. मागच्या आठवड्यात एक झकास स्क्रिप्ट लिहिली आहे. त्याच्यावर काम सुरु केले आहे. लोकेशन झाली आहे. आता अ‍ॅक्टर्स शोधतो आहे. संपुर्ण स्क्रिप्ट लिहिण्याचे माझे एक स्वप्न तरी पुर्ण झाले आहे. आता एक चांगली (उत्तम निर्मिती मुल्ये) असलेली शॉर्टफिल्म बनवायची आहे. आता बायको म्हणते आहे कि चुकिच्या प्रोफेशन मधे आला आहेस.


२) डॉन ३ पाहिला. तसा पाहिला तर चित्रपटात हिट होण्यासाठी लागणारा सर्व मसाला आहे. उत्तम निर्मिती मुल्ये आहेत, चांगले अभिनेते व अभिनेत्री आहेत. परदेशी चित्रीकरण आहे. पण तरिही मला हा चित्रपट नाही आवडला. चित्रपट पहिल्या फ्रेमपासुनच दर्शकांच्या मनाची तयारी करुन घेतो कि हा चित्रपट हॉलिवुडच्या दर्जाचा आहे आणि बॉलिवुडसारखा फारतु रडगाणे वैगेरे यात नसणार आहे. आणि पहिला एक तास दर्शकालाही हे पटते आणि त्याच्या अपेक्षा वाढतात. पण नंतर हा चित्रपट इतर हिंदी चित्रपटांच्या मार्गाने जातो. तसेच मला त्याच्या कथेमधेही दोष आढळले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठल्या बहिणीच्या मनात आपल्या भावाच्या खुन्याबद्द्ल मनात प्रेम उत्पन्न होईल? मला या चित्रपटात सगळ्यात जास्त आवडलेला भाग म्हणजे ह्र्-तिक आणि प्रियांका चा बॅले. जबरदस्त सिन आहे तो. मास्टरपिस.


३) मागच्या आठवड्यात हॉवर्ड युनिव्हर्सिटीमधे जाऊन आलो. मस्त वाटले. कॉलेजमधे असताना कधी वाटलेही नव्हते कि मी एक दिवस इथे येईल. इथे प्रवेश नाही मिळाला पण पाहिला तर मिळाले. कदाचित भविष्यात प्रवेशही मिळेलही. पाहुया.


४) काल फेसबुक वर जगजीतचे चिठ्ठी ना कोई संदेश हे गाणे त्याच्याच काही फोटोंचा व्हिडियो बनवुन टाकले होते. काळजात काहीतरी दुखले.


– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी

दिवस १३

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती.
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती
– ग्रेस१) कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाला. पण कविवर्य ग्रेस यांना पुरस्कार मिळाला पण तो त्यांच्या ललित लेखासाठी. असो त्यांच ललित लेखन ही काही कमी नाही. पण सहज माझ्या मनात विचार आला.आज लोकसत्ता मधे वाचले कि जेंव्हा कवि ग्रेस यांना विदर्भ भुषण हा पुरस्कार जाहिर झाला होता त्यावेळेस त्यांनी सांगितले होते कि

“आता हा पुरस्कार घेऊन मी काय करु, जर मला हा पुरस्कार आणि हे १ लाख रुपये १० वर्षापुर्वी मिळाले असते तर मी शँपेन आणि सिगारेट ची अजुन जास्त मजा घेतली असते.”

सध्या ग्रेस दवाखान्यात कर्करोगावर उपचार घेत आहेत. ग्रेस यांच्या कवितेची ओळख प्रथम मला झाली ती म्हणजे भय इथले संपत नाही या महाश्वेता मालिकेत लतादिदींनी गायलेल्या गीतातुन, नंतर मग मी ह्र्द्यनाथांच्या भावसरगम मधे जाउ लागल्यावर मला ह्र्द्यनाथ आणि ग्रेस यांच्यातील स्नेह समजला. मला ग्रेसच्या कवितेची ओळख ह्र्द्यनाथांच्या संगितातुन झाली असे म्हणणे इष्ट ठरेल. ग्रेसवर टिपण्णी करायची माझी लायकी नाही पण मनात मला काही साठवुन ठेवायचे नाही म्हणुनच तर इथे टोपणनावाखाली लिहितो आहे. तर ग्रेसच्या काही कविता खरोखर दुर्बोध आहेत, पण काही कविता इतक्या उच्च दर्जाच्या अभिजात आहेत कि बहुसंख्य लोकांना त्याच्या सुबोध कविता वाचुन असे वाटु लागते कि आपल्याला ग्रेस कळला आणि बाकिच्या ग्रेस न कळणार्‍या लोकांपेक्षा आपला बुध्यांक जास्त आहे. असो. पण ग्रेस सर आपले हार्दिक अभिनंदन!!! आणि आपल्या आरोग्यासाठी खुप खुप शुभेच्छा!!! लवकर बरे व्हा आणि आणखी लिहा. मला आवडणार्‍या ग्रेस च्या बर्‍याच कविता आहेत पण त्यातल्या त्यात मला आवडलेले एक कडवे –

“गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही; अलगद भरूनी यावे.”
– ग्रेस२) जोवर मनातले व्यक्त होत नाही, तोवर फार घुसमट होते. मग हे व्यक्त होणे एखादया जुन्या मित्राबरोबर भडाभडा बोलणे असेल किंवा असेच एका अपरिचीताबरोबर बस मधील संभाषण असेल. एखाद्या चित्रकारासाठी व्यक्तता म्हणजे चित्र असेल, तर एखाद्या गिर्यारोहकासाठी व्यक्तता म्हणजे एखादे शिखर काबिज करणे असु शकते. कोण्या विद्वानाला रोज काही बॉद्धीक काम केल्याशिवाय अन्न गोड लागत नसेल. मला माझ्या कंपनीतील एक मॅनेजर माहित आहे, जो एक उत्तम चित्रकारही आहे. तो मला सांगायचा कि एखादया आठवड्यात कुंचला हातात घेतला नाही तर चुकचुकल्या सारखे वाटते. मी आठवड्यातुन दोनदा तरी ग्रंथालया जातो, तेथील ग्रंथपाल बांगलादेशी आहे. त्या मी भेटलो कि तो अर्धातास तरी त्याच्या भारतातल्या दिवसांबद्द्ल बोलत रहातो. व्यक्त होणे फार महत्वाचे आहे. मनाचा प्राणवायु आहे.प्रत्येक माणसाला व्यक्त व्हायचे असते. आपल्या अस्तित्वाची समोरच्या माणसाने दखल घ्यावी अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. सध्याच्या एवढ्या जलद गती ने धावणार्‍या जगात माणसं व्यक्त होण्याचे विसरतात, आणि त्यांना ते विसरलेत हे ही कळत नाही. मग सुरु होते नुसती घुसमट. आपण कधी विचार केला आहे का? कि माझ्या साठी व्यक्त होणे म्हणजे काय आहे? कुठल्या रुपाने व्यक्त झाल्यावर तुम्हाला स्वतःची पुनर्निर्मिती केल्याचे सुख मिळते?


३) उस्ताद बिस्मिल्लाह खानसाहेब त्यांच्या अंतिम दिनांमधे रुग्णालयात होते. एके दिवशी त्यांनी आपला हात वर केला, त्यांच्या जवळच्यांना वाटले त्यांना पाणि वैगेरे पाहिजे असेल, म्हणुन त्यांनी जवळ जाऊन विचारले कि “क्या हुआ?”. उस्ताद्जी शांतपणे उच्चारले कि “मै मनही मन एक तान गुनगुना रहा था, भैरवी अच्छी जमी थी, तो मैंने दाद दे रहा था. इसिलिए हाथ उठाया ” आता काय बोलावे.


४) अल बिरुनि आसन्नमरणावस्तेत असताना त्याला एका गणिती प्रश्नाबद्दल जाणायचे होते. त्यासाठी त्याच्या एका मित्राला त्याने बोलावले होते. मित्राने त्याला त्या गणिताबद्दल सांगितले. आणि मग काळजी पोठी म्हणाला की अशा अवस्थेत तू हा विचार का करतो आहेस? तर बिरुनी म्हणाला ‘मी मरताना ह्या प्रश्नाचे उत्तर समजून मेलो तर बरे का न समजता मेलो तर बरे राहिल?’


५) जिमी हेंड्रिक्स हा अमली पदार्थांच्या नशेमधे नवीन अवघड चाली बनवायचा आणि गिटारने वाजवायचा, पण त्याच चाली सकाळी (नशा उतरल्यावर) तो त्याच आत्मविश्वासाने तशाच्या तशा वाजवायचा.


६) कारगिल लढ्यामधे लढलेल्या कित्येक हुतात्म्यांची बोटे मरणानंरही ट्रिगरला आवळलेली होती. हि लोके स्वत:ला एवढे अलिप्त कसे ठेवु शकतात? एवढी कर्तव्य्-निष्ठा कुठुन येते? त्यांना मरणाची भिती का नसते? का ते मरणाची भीती विसरतात. कुठेतरी वाचल्याचे आठवते कि “Courage is not absent of fear, courage is overcoming fear.” भीती सगळ्यांनाच वाटते, जो इतरांपेक्षा जास्त वेळ तग धरतो तो धाडसी असे साधे गणित असते. पण लोक प्रश्नानेच घाबरतात.


७) कंपनीने नविन नियम काढला आहे कि Office मधे internet चा वापर वैयक्तिक कारणासाठी करु नये, जो सापडेल त्याला (कंपनीतुन) कमी करण्यात येईल. त्यामुळे यापुढील पोस्ट कधी येईल सांगता येणार नाही. पण मी प्रयत्न करेन जास्तित जास्त वेळा लिहिण्याचा…

– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी

दिवस १०

१) आज कुटुंबाची तब्येत ठिक नाही आहे. त्यामुळे आज MI4 पाहता नाही येणार. मी ऐकले आहे कि अनिल कपुर ने त्यात अत्यंत फालतु रोल केला आहे जो करण्याची त्याला काही एक जरुर नव्हती.

२) दुपारी सर्फिंग करताना लॅपटॉप मधे व्हायरस आला, त्याने माझा १ तास घेतला, शेवटी काढला त्याला पण त्यामुळे झालेल्या मनस्तापामुळॅ आणि तणावामुळे (बॅकअप घेतला नव्हता) मी झोपलो ते थेट संध्याकाळी ५ वाजताच उठलो. हल्ली मी लहान सहान गोष्टींचे फार टेंशन घेऊ लागलो आहे. मी असा नव्हतो.

३) जिम झाली. जिम मधे पुन्हा एकदा shawshank redemption हा अप्रतिम चित्रपट पाहिला. त्यातला नायक शेवटी म्हणतो

“Hope is a good thing, may be the best of the things. No good thing ever died.”

४) मित्राला जुने पैशे द्यायचे होते ते देऊन टाकले. हुश्श!!!

५) चेतन भगत चे Evolution हे नविन पुस्तक आणले आहे. पाहुया कसे आहे ते.

५) संपला विकएंड.

– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी

दिवस ९ – तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा||

१) कालची पोस्ट अजुनही प्रकाशित केली नाही. कंटाळा केला. आज MI4 पाहायचा होता पण बहुतेक आज शक्य नाही होणार. उद्या पाहुया.

२) आज शनिवार, काल उगीचच जागत (पहाटे ३ वाजेपर्यंत) बसल्यामुळे आज उशिरा उठलो. पण बर्‍याच वेळा असे ही होते कि रोज ऑफिस ला जायला कंटाळा करतो पण शनिवार आणि रविवार मात्र पटकन उठुन बसतो. पण फक्त उठुन बसतो. तयार व्हायला, आंघोळ करायला उगीचच कंटाळा करतो.

३) मला केस कापायचे होते, माझ्या जुन्या प्रोजेक्टच्या मॅनेजरलाही कापायचे होते आणि मग काय दोन्ही फॅमिली निघाल्या मॉल मधे. तिथुन निघायलाच ४ वाजले. घरी पोचेपर्यंत ५ वाजले. मी एक हॅन्डमेड पेपर ची डायरी\वही घेतली आहे. आणि घरी आल्या आल्या त्यात लिखाण ही सुरु केले आहे. हॅन्डमेड पेपर वर अक्षर अजुन छान वाटतात. लिखाणाला एक Aunthenticity येते. (निदान मला तरी असे वाटते.)

४) जिम ला जाऊन आलो. आणि एक मित्र जो सारखा जिम ला बुट्टी मारत असतो त्याच्या घरी जाऊन आलो तर पाहतो तर काय त्याच्या रुम पार्टनर ने २ लिटर चा Jack Daniel ची बाटली आणली होती. आणि हा रुम पार्ट्नर दर शनिवारी उपवास करतो आणि रात्री दारु पितो. आवरा. मी ही कॉलेज मधे असाच weird होतो म्हणा. मी सिगरेट आणि लस्सी एकत्र प्यायचो 🙂 (आवरा)

४) त्या माझ्याबरोबर मॉल मधे आलेल्या मित्राला एक मुलगी आहे. इतकी गोंडस आहे ती कि काय सांगु. आणि तिला माझे सात मजली हसु फार आवडते. त्यामुळे मी तसे हसावे म्हणुन ती मला ना ना प्रकारे हसवण्याचा प्रयत्न करत असते.

५) संध्याकाळी आमच्या बंगाली मित्राकडे त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त बिर्याणी आणि मटन चा बेत होता. काय मटन झाले होते. अहाहा!!! अजुनही चव जिभेवर रेंगाळत आहे. आणि त्यानंतर अजुन एका मित्राकडे गेलो. पण तिथेही जेवण उत्तम होते असे इतर जेवणार्‍यांकडुन कळाते पण आमचे उदर आधिच भरले असल्यामुळॅ त्याचा आस्वाद घेता नाही आला.

६) आजही झोपायला रात्रीचे (पहाटेचे) २:३० झाले.

– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी

दिवस ८

१) मान अजुनहूही ठणकत आहे.२) काल मित्रांना घरी जेवायला बोलावले होते. मस्त वेळ गेला.३) आज शुक्रवार. उद्या परवा सुट्टी. इथे आठवडा कसा निघुन जातो कळतही नाही. आईनस्टाईन ने म्हटल्याप्रमाणे Time is relative हेच खरे आहे.४) मला घरुन ऑफिस ला येण्यासाठी आणखी एक बस मिळाली. 🙂 माझे स्वत:चे बरेच phobia आहेत. आता जसे जसे हे phobia मिळतील त्यांना चिरडुन टाकायचे आहे.


५) आज काही लिहिण्यासारखे सुचत नाही आहे. होते कधी कधी असे.


५) Pretzel मला खुप आवडतात. Hummus Sauce आणि Pretzel खायला मजा येते. पण आता व्यायाम सुरु केल्यामुळे ते बंद करावे लागणार आहे.


६) शॉर्ट फिल्म साठी संहिता शोधतो आहे, पण मनाजोगा विषय मिळत नाही.


७) च्यायला शंकर महादेवन बद्दल तर आदर होताच पण आज एहसान बद्दल हि एक नविन माहिती मिळाली. त्या या वर्षी Fender या गिटार कंपनीने Custom made गिटार दिली. हा मान मिळवणारा तो पहिला भारतिय आहे. Jimmy Hendriz ला हि हा मान मिळाला होता.
http://blog.mi.edu/post/Ehsaan-Noorani-(Guitar)-Receives-Signature-Fender-Squier-Featured-in-Sound-Box-Magazine.aspx– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी

दिवस ७

१) मान थोडी बरी आहे. भारतात घरी धान्य ओतायचे एक माप (भांडॅ) होते. धुपाटण्यासारखा आकार होता त्या मापाचे. (इथे दिलेला फोटो शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली आंतरजालावर.) मान अवघडली कि त्याच्यावर मान ठेवुन एक तास झोपले कि मान १००% मोकळी व्हायची. मी खरोखर त्या मापाला मिस करतोय. पण अमेरिकेत ते तसे माप आणायचे कुठुन? काल घरात एक वाईनची रिकामी बाटली बर्‍याच दिवसांपासुन पडली होती. मी मुद्दामच ठेवली होती. मला वाईनची नावे लक्षात रहात नाही. मग दर वेळेस मी नवीन वाईन घेऊन येतो. पण या वेळेस मला हि वाईन आवडली त्यामुळे रेफरन्स साठी ठेवली आहे. खरतर मोबाईल मधे ब्रँड चा फोटोही काढला आहे. पण तरीही बाटलीही ठेवली आहे.तर ती बाटली मानेखाली घेऊन झोपलो, त्यामुळे आज जरा बरे वाटते आहे.
२) पुर्वीच्या काळच्या सम्राटांचा पत्रव्यवहार सामन्यांसाठी गुप्त असायचा. पण काल मला दोन नटसम्राटांमधला पत्र संवाद वाचायला मिळाला. अमिताभ आणि दिलिपकुमार.
अभिताभ ने दिलिपकुमार च्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या शुभेच्छा

Jalsa , Mumbai Dec 10/11, 2011 Sat/Sun 1 : 54 AM
Its a celebration for the greatest, on the eve of his birthday. He will turn 89 tomorrow, the 11th of December. Exactly 20 years older to me by birth and exactly 2000 years ahead of me in our common vocation. He is my idol and has been since the day I first saw his work. He has been an inspiration not just for me but I am certain to thousands of those that have ever dreamt of facing a camera for the art form called cinema. His presence his aura and his dedication to film shall be documented as ‘before Dilip Kumar and after Dilip Kumar’. He set fresh norms of performance in his acts of excellence, faultless and beyond any kind of improvement. His greatest quality was his connect with those that stood before him in the frame to act. His strength of delivery and his strength of connect with any character he portrayed has been unique and unsurpassable. On the eve of his birthday, I wish him good health and a long life of peace and happiness. He was the best and still is. Dilip Kumar, Yusuf Khan, Dilip Saheb … happy birthday !!
I entered his spacious home after decades. After minor cosmetic changes, it has remained the same. My visits to his place have been limited, but eventful on each occasion. A meeting of the artists and the film fraternity, a midnight informal call, a casual trip to see his excellent skills at badminton, or a shoot at his luxurious lawns during the making of ‘Zameer’ with his wife and my co star Saira ji, Saira Banu ! All have been clearly etched in my mind. And why not ? He was the one actor that we as young students in University broke boundaries and hostel rules to go see his films night after night. His early films had been historic in content and repute – Aan and Shaheed – ones that I still remember seeing in the darkness of cinema halls with the barest minimum facility and comfort. For 4 annas, 25 paise, a quarter of a rupee, we would sit on wooden benches right up in front in the theaters and marvel at what our hero would enact. And among the many that we saw and enjoyed, it was for me always a Dilip Kumar that stood out. Different and distinguished. And always without fault.
And then one day I stood along with him on the sands of Juhu as the camera rolled to give the mahurat shot for ‘Shakti’, the only film that we worked together in. Our first shooting scene in the film was in a jail sequence, where the police official but also my Father in film comes to visit me and tries to convince me that I was taking a wrong path in life and I disagree. Tough to stand in front of one whom you have admired for ages, and disagree with. But it happened and it kept happening day after day, till the film was complete. There were electric moments between him and me in the script, written by that incredible team of writers Salim – Javed, and each moment was filled with the distinction of great and impressive drama.
The film completed its work during the same time when I was injured during ‘Coolie’ and released when I was still recovering from my ailment. The final print was shown to me on a make shift theater put up in Prateeksha, for I was still not well enough to move out of the house. Did I ever imagine many years ago, as I sat in a rather ill equipped theater in a corner of Kathmandu in Nepal, around 1954, that I would one day share the same screen space with this tremendous talent that would explode in front of me. Never ! And it still remains a illusion in my life to have actually been a part of a project which was headed by this thespian ! God has been kind, very kind !!
And in the morning at the studios of Mehboob, the photoshoot for the film ‘Department’ … a cameo of small proportions .. intense and edgy as always with Ram Gopal Varma ..
Good night and may you always be blessed …
-AB
(http://bigb.bigadda.com/?paged=3)

त्यावर दिलिपकुमारने अमिताभचे केलेले आभार प्रदर्शन

Wednesday, December 14, 2011
My Dear Amitabh:
With tears of pride in her eyes Saira handed over the print out of your eloquent tribute to my work in your blog. I read it once, then again and again.
As you yourself would be keenly aware, we actors are completely oblivious of ourselves and our surroundings while we perform and, even when we watch our work in the rushes shown to us, our senses and vision are trained to detect shortcomings more than accomplishments. That’s the only way we know to improve and render performances that come close to our own satisfaction. And it is always the audience who have the absolute right to acclaim or reject our work, however hard we may have worked to achieve perfection and excellence.
I am certainly privileged to know from your affectionate compliments that someone as knowledgeable and competent as you has liked my work. Yes, now that you have reminded me, I can recall the scenes that brought us together before the cameras for Shakti. I should say the respect and admiration are mutual. Not just Shakti, your work in several films I have watched has been world class and inimitable. In recent times I can remember Black and, if I remember right, Saira and I were at a loss for words at the premiere night, after the curtain came down, to express our myriad feelings of admiration for your outstanding performance. It is a pity the film missed the Oscar nomination. If any Indian actor, in my personal opinion, deserves the world’s most coveted award, it is you. I have heard so much about Paa which we didn’t catch up with. You know how Saira is—she never could see me die in my films and she could not muster the courage to see your death scene in Paa.
Thank you, Amitabh, for your warm love and good wishes. May God keep you, Jaya and your family happy always.
DK
(http://thedilipkumar.mouthshut.com/2011/12/on-amitabh-and-my-admiration.html)

हि लोकं कुठल्या मातीची बनेलेली आहे, कोणास ठाऊक. भारीच!!!३) काल अभिजीत बाठेंनी दिलेल्या माझ्या comment वरील प्रतिक्रियेवरुन असे वाटले कि माझ्या ब्लॉग चे नाव वाचकांना संभ्रमावस्थेत टाकते. पण आता मी ते बदलु शकत नाही. (Actually बदलु शकतो पण आता मला ते बदलायची इच्छा नाही.)४) आज काहिच थंडी नाही. च्यायला इथले हवामान फारच लहरी आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी परीक्षा पाहतात. पण मार्च अखेरीस पुन्हा उन्हाळा सुरु होतो. पाहुया हा हिवाळा कितपत सोसतोय.५) अभ्यास करायचा, अभ्यास करायचा आहे. पण मन एकाग्र होत नाही आहे. लहानपणी शाखेतील एका गाण्याची आठवण होते आहे. च्यायला मी गाण्याची ओळ देणार होतो पण आंतरजालावर पुर्ण गाणेच सापडले.

हिंदू ऐक्य घोष हा निनादुद्या दिगंतरी
जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी ॥धृ॥

दिव्य वारसा तुझा विश्वमान्य संस्कृती
वैभवात वाढल्या आपुल्या पिढ्या किती
हाय दुर्दशा तुझी वेदना उठे उरी ॥१॥

नांदले युगेयुगे अंश ईश्वरी इथे
भेदभाव मानिसी मानवा मधे तिथे
ऐक्य भाव जागृती कार्य हेच ईश्वरी ॥२॥

उठ मारुती परी सूर्यबिंब ग्रासण्या
संघटित शक्ति हो रामराज्य स्थापण्या
कालकूट प्राशुनी उठ शंकरा परी ॥३॥

दिव्य शक्तिने तुझ्या दुष्ट दैत्य मर्दिले
स्नेह भक्ति शक्तिने दैन्य दुःख वारिले
पांचजन्य घोष हो जाग अर्जुना परी ॥४॥

शाखेत जोपर्यंत खेळ खेळायचो, देशाच्या विविध विषयांवर चर्चा व्हायच्या तेंव्हापर्यंत शाखेत उत्साहाने जायचो, पण मग हळु हळु धार्मिक चर्चा होऊ लागल्या, वादग्रस्त विषय येऊ लागले मग माहित नाही मला काय झाले. थोडे अवघडल्या सारखे होऊ लागले. हे क्षेत्र माझे नाही असे आत जाणवु लागले. आणि मी शाखेला जाणे सोडले. वर दिलेले गाणे मात्र मला खुप आवडते. खुप संदर कविता आहे. इथे मला नमुद करावेसे वाटते कि मी हिंदु आहे पण हिंदुत्ववादी नाही. स्वतःही जगा आणि दुसर्‍याला मनसोक्त जगु द्या. या मताचा मी आहे.
जेंव्हा जेंव्हा मी Depress असतो या गिताची कडवी गुणगुणतो. जालिम औषध आहे हे गाणे. पण कोण कुठल्या context मधे गातो, हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे.६) BMM 2013 चे अधिवेशन बोस्टन मधे होणार आहे. त्याची logo\Slogan कॉम्पिटिशन चालु आहे. आज अचानक सुचले. पाठवुन दिले आहे, पाहुया काय होते ते.– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी

दिवस ६

१) काल बेड ऐवजी कारपेटवर झोपलो तरी मान दुखायची थांबली नाही.२) मला नेहमी वाटायचे कि बस ड्रायव्हर जर मी एकटाच बस स्टोपवर असेल तर न थांबताच निघुन जातो. पण आज मी हात केल्यावर बस स्टॉप नसताना देखील थांबला. बरे वाटले. शेवटी माणुस म्हणजे माणुस असतो. हाडामांसाचा, आणि भावभावनांचा.३) घरात एक गिटार, कि-बोर्ड आणि अ‍ॅकोर्डिअन धुळ खात पडुन आहे. वाट बघत असतील कदाचित मी कधी हात लावेन त्यांना. किंवा खुश असतिल माझ्या सारखे (?)(इथे तुम्हाला पाहिजे तो अर्थ घ्या, I dont care) त्यांना हात लावत नाही म्हणुन.४) काल एकाचा ब्लोग वाचला, तो बंधु दारुच्या व्यसनाशी लढत होता. २१ वर्षे त्याने दारु पिली. नोकरी वैगेरे सर्व गमावुन बसला. पण ब्लॉग छान लिहितो. पण त्याने त्याचे लिहिलेले अनुभव वाचुन शहारे आले. 😦 त्याला मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते.

“जिंदगीभर गालिब यही गलती करता रहा,
धुल चेहरेपर थी और आईना साफ करता रहा,”५) अरे हो, मागच्या महिन्यात विहिर हा चित्रपट पाहिला. आवडला का नाही हे मला समजल नाही. (बहुतेक चित्रपटाचे काही भाग कळले नाहीत). पुन्हा पाहणार आहे. त्यानंतरच खरा review देईन.६) आज आय्-पोड वर “Rockstar” डे आहे. सकाळ पासुन त्यातली शेहनाई, कुन-फय-कुन, कतिया करु आणि माझे सगळ्यात आवडते जो भी मै भरपुर वेळा ऐकुन झाले. मस्त वाटते आहे. (मानेचे दुखणे विसरलो आहे.) कोणीतरी म्हणले आहे ना

“Happiness chooses its own time.”७) आज बाबांचा सकाळी सकाळी ६:३० वाजता फोन आला. बंगल्याच्या पार्किंग मधे वारली पेंटिंग काढले आणि छान दिसते आहे. आमचे बाबा म्हणजे फार मनस्वी आहे. मनात आले कि करुन टाकतात. काही विचारु नका. त्यांच्याबद्दल पुन्हा केंव्हा तरी. पण मनस्वीतेवरुन संदिप खरे च्या कवितेच्या काही ओळी आठवल्या.

“मी मनस्वीतेला शाप मानले नाही अन उपभोगाला पाप मानले नाही,
ढग काळा ज्यातुन एकही गेला नाही, नभ ऐसे मी अद्याप पाहिले नाही”८) संदिप खरे आणि सलिल कुलकर्णी यांचे आमच्या पिढीवरील उपकार आहेत, त्यांनी आमच्या पिढिला मराठी पुन्हा शिकवली. खुप खुप आभार, संदिप आणि सलिल!!!९) रघु दिक्षीत चा एक नवीत अल्बम आला आहे. मस्ती कि बस्ती. तोही भारीच असणार. 🙂 तुम्ही म्हणणार च्यायला त्या रघु पेक्षा तुला त्याच्यावर जास्त विश्वास आहे. अहो दादा, असे कधी तुमच्या बरोबरपण झाले असणार. आपल्यापेक्षा आपल्यावर दुसर्‍यांचाच जास्त विश्वास असतो.१०) खुप खुप वर्षांपुर्वी म्हणजे शाळेमधे असताना माझ्याकडे एक फिश पाँड होता. ब्लॅक मोली, किसिंग गोरामी, गप्पी, शार्क, इल, गोल्ड फिश, खाण्यासाठी किडे, ऑक्सिजन मशिन सगळ होतो पण त्याच वर्षी उन्हाळ्यात तापमान खुप वाढले आणि अ‍ॅरलडाईट वापरुन बनवलेल्या त्या फिश पाँड च्या कांचांचे जोड निघाले आणि लिक होऊ लागले. घरचे वैतागले आणि सगळे मासे एका ओळखीच्यांना देऊन टाकले. 😦 आता पुन्हा कधी घेणार फिश पाँड काय ठाऊक.(आणि हि पोस्ट संपवताना मी जगजित ची तेरा चेहरा कितना सुहाना लगता है ऐकतो आहे.)– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी

दिवस ५

१) जिम चालु करुन १ महिना झाला आज. बरे वाटते आहे. काही तरी जिवाला चांगले करतो आहे. माझे आजोबा पैलवान होते. त्यांच्यासाठी आमच्या कडे गाय पाळली होती. “कल्याणी” नाव तिचे. रोज एक चरवी दुध प्यायचे आजोबा. आमचे बाबा हि काही कमी नाही एका बुक्की नारळ फोडला होता माझ्या देखत. आणि बाबांनी व्यायाम सोडुन ३५ ते ४० वर्षे झाली असतिल. त्यामुळे असा वारसा असेल तर मी तर कोल्हापुरात तालिमच लावली पाहिजे होती. Actually लावणार होतो पण अभ्यासामुळे जमले नाही. शाळेत जेंव्हा आम्ही वाचले कि टिळकांनी दोन वर्षे शाळा, कॉलेज सोडुन फक्त व्यायामासाठी दिली. आम्ही फार impress झालो होतो. पण आम्हाला जमले नाही.२) आज बाहेर -३ डिग्री तापमान होते. पण येताना त्रास होत नाही कारण गरम पाण्याने आंघोळ करुन गरम गरम चहा घेऊन निघतो, पण चालत जाताना मात्र त्रास होतो. कार घ्यायला पाहिजे आता. माझा आळस लायसन्स काढायचा. 😦३) सयाजी राव गायकवाडांनी म्हणे दिल्ली दरबारात इंग्लंडच्या राणीचा अपमान केला होता, BBC ने त्याची बातमी छापली होती. मराठी रक्तातील धुगधुगी अजुन गेली नव्हती हे जाणुन बरे वाटले. (http://www.bbc.co.uk/news/world-asia-16051168)४) आज आंतरजालावर चारुता सागर यांचे पुस्तक कुठे विकत मिळते आहे का पाहिले, पण सगळी कडे out of stock दाखवते आहे. मला वाचायचे आहे त्यांना. प्लिज प्लिज प्लिज जर तुम्हाला कुठे मिळाले तर मला कळवा.५) Euphoria चा Item अल्बम ऐकला, नेहमी प्रमाणेच हाही अल्बम छान आहे, पण काहीतरी कमी वाटली. त्याच्या आधीच्या Band मधील फक्त एकच जण आता त्याच्याबरोबर आहे. आणि या अल्बम मधे रॉक संगित जरा जास्तच वापरले आहे. असो. तरिही मी त्यांचा चाहता है. पलाश सेन, आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है.६) हल्ली मान सारखी दुखत असते. बहुतेक माझी झोपायची पद्धत चुकीची आहे.– आपला (आपल्या पासुन ६०० प्रकाशवर्षे दुर असलेला) केपलरवासी